महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 6 मार्च व 7 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. दिनांक 6 मार्च रोजी संस्थेचे अध्यक्ष मा.खा. श्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक कथाकार कवी श्रीमान ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर यांच्या उपस्थितीत व माननीय डॉ मीनलताई पाटील खतगावकर, सचिव, गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या व श्रीमान बाळासाहेब पाटील खतगावकर सचिव श्री साई शिक्षण प्रसारक मंडळ, खतगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्याचबरोबर समारोप व बक्षीस वितरण सोहळ्यासाठी रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री जगताप साहेब व माननीय बाळासाहेब पाटील तथा प्रमुख अतिथी मा. डॉ.सौ.मिलनताई पाटील खतगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपले ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे, अन्यथा प्रवेश मिळणार नाही. याची नोंद घ्यावी. शेलापागोटे/फिश पॉड कार्यक्रमासाठी ग्रंथालयामध्ये श्री कृष्णा भंडारवाड यांच्याकडे एक रुपये प्रति चिठ्ठी आपणास मिळेल व फिश पॉड लिहिल्यानंतर तो तेथील बॉक्समध्ये टाकावे.. उद्घाटन समारंभाच्या दिवशी पारंपरिक (traditional) वेशभूषेत विद्यार्थ्यांनी यावे असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा ही उद्घाटनाच्या दिवशी सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी आपले स्वतःचे साहित्य घेऊन स्पर्धेसाठी वेळेच्या आत हजर राहावे.
आदेशावरून,
प्राचार्य
श्री मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महाविद्यालय शंकर नगर